मुंबई : महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर समजणार आहे. तरीही त्यासंदर्भात अंदाज वर्तवणारे अनेक ओपिनियन पोल समोर येताना दिसत आहे. आता एका खासगी वाहिनीने केलेल्या ओपिनियन पोलमधून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागांपैकी एनडीएला 45 जागा मिळतील तर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला केवळ 3 जागा मिळतील असं या पोलमधून सांगण्यात आले आहे.
या ओपिनियन पोलमुळे महाराष्ट्रात महायुतीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीची चिंता मात्र नक्की वाढणार आहे. देशातील एकूण 543 पैकी 329 जागांचा सर्व्हे आतापर्यंत स्पष्ट झाला असून त्यामध्ये एनडीएला 181 जागा मिळतील असा मोठा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीचा फायदा भाजपला
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा हा भाजपला होणार असल्यायाचे देखील या सर्व्हेमध्ये म्हटलं गेलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मतदारांमध्ये कुणाला मत द्यायचं, याबद्दल संभ्रम असल्याने ही स्थिती निर्माण होऊ शकते असं नमूद केले गेले आहे.