Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala Crime : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने मावळ तालुक्यातील तरुणांच्याकडुन लाखोत पैसे उकळणाऱ्या आयएनएस शिवाजी मधील एक कर्मचारी व त्याच्या मैत्रीणीवर गुन्हा दाखल, घरात सरकारी शिक्के व लेटरहेड सापडल्याने फसवणुकीची व्याप्ती मोठी असण्याचा पोलिसांचा संशय..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 October 2022, 10:27

पुणे : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने मावळ तालुक्यातील तरुणांच्याकडुन लाखात पैसे उकळणाऱ्या सैन्य दलातील एका कर्मचाऱ्याचा बाजार पुणे (जिल्हा) ग्रामिण पोलिसांनी उठवला असुन, लोणावळा येथील आयएनएस शिवाजी मधील एक कर्मचारी ओमकार सुनिल भावे (सध्या जीई सीएमई दापोडी, सरकारी निवास, मुळगाव -कुसगाव ता. मावळ जि. पुणे) याला लोणावळा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. दरम्यान ओमकार सुनिल भावे याच्याबाबत केंद्रिय सुरक्षा विभागानेही ग्रामिण पोलिसांना महत्वाची माहिती पुरवली आहे.

जिल्हा (ग्रामिण) पोलिसांनी ओमकार भावे याच्या घरातुन सरकारी शिक्के , लेटरहेड ताब्यात घेतले असुन, ओमकार भावे व त्याची एक मैत्रीण रचना सुर्वे या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर ओमकार भावेच्या विरोधात वर्षा शांतेश्वर कदम (वय- २९ वर्ष शिक्षण १२ वी व्यवसाय- कँटीन व्यवसाय रा. जिल्हा परीषद शाळे शेजारी, विश्वनाथ ससाणे यांचे भाड्याचे रुम मध्ये कुरवंडे ता. मावळ जि. पुणे मुळ रा. लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद) या महिलेने नोकरी लावण्याच्या आमिषाने आठ लाख रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार लोणावळा शहर पोलिसात दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा कदम या लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या संस्थेचे  कॅन्टीन चालवतात. तर ओमकार भावे हा आयएनएस शिवाजी या केंद्रिय संस्थेच्या आरोग्य विभागात क्लर्क या हुद्द्यावर काम करत होता. कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी ये-जा असल्याने, कदम व भावे यांची ओळख झाली. या ओळखीतुनच भावे याने रेल्वेत नोकरी लावण्याच्या उद्देशाने अठरा लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र वर्षा कदम यांच्याकडुन एवढी रक्कम अॅडजस्ट होणार नसल्याचे लक्षात आल्याने  भावे  याने आठ लाख रुपयात नोकरी लावण्याचे आश्वासन देत वेळोवेळी पैसे उकळले होते.

दरम्यान, पैसे देऊनही काम होत नसल्याने, वर्षा कदम यांनी ओमकार भावे याच्या मागे कामाचा तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळुण ओमकार भावे याने वर्षा कदम यांना नोकरीवर हजर होण्याबाबतचे बनावट नियुक्ती पत्र, सरकारी ड्रेस व कपडेही आणून दिले होते. मात्र वर्षा कदम यांना संशय आल्याने त्यांनी शहर पोलिसात धाव घेतली व ओमकार भावे यांच्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तर दुसरीकडे ओमकार भावे हा सरकारी शिक्के व लेटरहेडचा वापर करुन लोकांची फसवणुक करत असल्याचा संशय केंद्रिय सुरक्षा विभागाला  आल्याने, त्यांनीही ग्रामिण पोलिसांना अलर्ट केले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Wednesday, 21 May 2025, 14:36
ex minister and congress leader to join eknath shinde led shivsena solapur

काँग्रेसला राज्यात पुन्हा एक मोठा झटका, आता माजी मंत्र्याने साथ सोडली

Wednesday, 21 May 2025, 14:25

पुण्यात घरफोडीच्या घटनेत वाढ, बंद घरांना लक्ष्य करून १९ लाखांचा ऐवज लंपास

Wednesday, 21 May 2025, 14:23
Farmers to take legal recourse, as dist starts stamping process

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

Wednesday, 21 May 2025, 14:13

पुण्यात दमदार पाऊस, रस्त्यांना नद्याचे स्वरूप; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क होडी चालून केले आंदोलन

Wednesday, 21 May 2025, 13:45
maharashtra government reduces charges of mojani and hisse vatap

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! आता फक्त २०० रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Wednesday, 21 May 2025, 13:21
Next Post

राजेगावात जिवा महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.