Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीएम किसानचा 16 वा हफ्ता देण्याचं ठरलं; 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 24 February 2024, 21:31

पुणे : केंद्र सरकारतर्फे अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या जात आहेत. त्यात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार, या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचेही यावेळी वितरण होणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राबविली जात आहे.

या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार ६३८ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

पीएम किसान उत्सव दिवस होणार साजरा

पीएम किसान उत्सव दिवस बुधवारी केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा केंद्रे या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.

शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रक्कम होणार जमा

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरीत होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अवैध गर्भाशय शस्त्रक्रियांना लागणार लगाम; आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिला कारवाईचा इशारा

Wednesday, 11 June 2025, 9:43

महाराष्ट्रात कोरोनाचे ८९ नवीन रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ६१५ वर, आरोग्य विभाग सतर्क

Wednesday, 11 June 2025, 9:43

राज्यात काही ठिकाणी पाऊस, तर विदर्भात उकाडा कायम; महाराष्ट्रात मान्सूनची संमिश्र स्थिती

Wednesday, 11 June 2025, 8:04

Today’s Horoscope: कोणत्या राशीला मिळणार यश, कुणाला संयम ठेवावा लागेल? पाहा आजचे राशीभविष्य

Wednesday, 11 June 2025, 7:46

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित; ४,८६२ अर्ज रखडले, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

Tuesday, 10 June 2025, 22:59

महाराष्ट्र सरकारकडून नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी

Tuesday, 10 June 2025, 22:39
Next Post

वाघोली-बकोरी रस्त्यावर अपघात; ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.