पुणे: चालकाचे ट्रॅकवरील नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिल्याने नवले पुलाजवळ विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या मुंबई-बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर थांबलेल्या वाहनांना धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.