अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणातील दोषी रमेश चंदना याला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) 10 दिवसांचा पॅरोल दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रमेश चंदना याला त्याच्या भाच्याच्या लग्नाला हजेरी लावायची होती, यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या भाचाचे लग्न ५ मार्चला होणार आहे. रमेश चंदना हा या प्रकरणातील दुसरा आरोपी असून त्याला पॅरोल मंजूर झाला आहे.
21 जानेवारी रोजी आरोपींनी आत्मसमर्पण केले होते
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 11 दोषींनी 21 जानेवारी रोजी आत्मसमर्पण केले. या सर्वांना 2002 च्या गोध्रा दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. आपल्या अर्जात दोषीने न्यायालयाला सांगितले की, त्याला त्याच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावायची होती. शुक्रवारी न्यायमूर्ती दिव्येश जोशी यांच्या आदेशानुसार रमेशला दहा दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे