लोणी काळभोर (पुणे)- मैत्रीणीवर पैसे उधळण्यासाठी सोलापुर जिल्हातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागिल पंधरा दिवसापासुन पुणे-सोलापूर रोडवर कवडीपाट ते यवत दरम्यान मारहान करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या केडगाव येथील ठगाच्या मुसक्या आवळण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.
दिपक बाबासाहेब हांडाळ (वय- 24, रा. हंडाळवाडी, केडगाव ता. दौंड) हे त्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मारहान करुन त्यांच्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या संशयित ठगाचे नाव असुन, मैत्रीणीवर पैसे उधळण्यासाठी सोलापूर जिल्हातील टेंभुर्णी परीसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लुटत असल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. दिपक हंडाळ याने मागिल पंधरा दिवसाच्या काळात टेंभुर्णी परीसरातील आठ ते दहा केळी उत्पादक शेतकऱ्यांना लुटले असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान मोटार सायकलवरुन येणारा 25 ते 26 वर्षीय तरुण सोलापुर जिल्हातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मारहान करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम लुटत असल्याची बाब पुण्यनगरीचे पत्रकार विजय काळभोर व नितीन करडे यांनी निर्दशनास आणली होती.
“पुणे प्राईम न्यूज” ने दोन दिवसापुर्वी केळी उत्पादक शेतकऱ्यांना मारहाण करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या ठगाची फोटोसहीत बातमी प्रसिध्द केली होती. या बातमीच्या आधारे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिपक हंडाळ या संशयीत ठगाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दिपक हंडाळ याच्याकडुन मारहाण झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिपकला ओळखले आहे.
“पुणे प्राईम न्यूज” ला मिळालेल्या माहितीनुसार, दिपक हंडाळ हा केडगाव जवळील हंडाळवाडी येथील रहिवाशी असुन, त्याला दोन मुले व पत्नी असा परीवार आहे. दिपकच्या घरची आर्थिक परीस्थिती बेताची असुन, तो मागिल चार ते पाच वर्षापासुन चौफुल्यावरील एका नामांकित वाहन कंपणीच्या शोरुम मध्ये सेल्समन म्हणुन काम करत होता. दिपक हा विवाहीत असला तरी, त्याच शोरुम मध्ये काम करणाऱ्या लोणी काळभोर-हडपसर परीसरातील एका तरुणीबरोबर त्याचे सुत जुळले होते. याच तरुणीवर पैसे उधळण्यासाठी दिपकने सोलापुर जिल्हातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना टार्गेट केले होते.
सोलापुर जिल्ह्यात उजनी धरणाच्या आसपास केळीचे पिक मोठ्या प्रमानात घेतले जाते. वरील भागातील केळी उत्पादक शेतकरी रोज संध्याकाळी केळी घेऊन, विक्री साठी पुणे अथवा मुंबई बाजारपेठेत टेंपोतुन येतात. पुणे अथवा मुबंई बाजार समितीत केळीची विक्री करुन, टेंपोमधुन शेतकरी परत घऱाकडे निघाल्याची संधी साधुन, दिपक हंडाळ हा कवडीपाट टोलनाक्यावरील हिरा गार्डनच्या चहाच्या टपरीवर थांबत असे. केळीची विक्री करुन आलेले शेतकरी व त्यांचे टेंपोही रात्रीच्या वेळी चहा पिण्यासाठी हिरा गार्डनच्या चहाच्या टपरीवर थांबतात.
दरम्यान, चहा घेऊन टेपोंचालक पुढे निघाला की, दिपक वाकवस्तीपासुन उरुळी कांचन पर्यंत मोका साधुन मोटारसायकल टेंपोला आडवी मारत असे. टेंपो थांबला की, टेंपो मोटारसायकलला घासल्याचे कारण पुढे करत टेंपो चालक व टेंपोमधील शेतकऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात करत असे. मारहाण असह्य झाल्याने, शेतकरी मोटारसायकलच्या नुकसानापोटी दिपकला पंधरा हजारापासुन पुढे रक्कम देत असत. वरील प्रकार मागिल पंधरा ते वीस दिवसापासुन चालु होता. मात्र चार दिवसापुर्वी ही बाब पुण्यनगरीचे पत्रकार विजय काळभोर व नितीन करडे यांनी निर्दशनास आणल्याने, पोलिसांनी दिपकच्या मुसक्या आवळल्या.
दिपक हा सटकु…
दिपक हा विवाहीत असुन, त्याला दोन लहाण मुले आहेत. पत्नी व आईवडील शेतात राबतात तर दिपक हा चौफुल्यावरील एका नामांकित वाहन कंपणीच्या शोरुम मध्ये सेल्समन म्हणुन काम करत होता. दिपक विवाहीत असला तरी, त्याचे त्याच शोरुम मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचे सुत जुळले होते. याच तरुणीवर पैसे उधळण्यासाठी दिपकने वरील मार्ग निवडला होता. दिपकने घरच्यांना पंधरा दिवसापुर्वी अपघात झाल्याचे सांगुन, नोकरी सोडली होती. मात्र तो अपघात होता की केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या टेंपोचा पाठलाग करतांना दिपक रस्त्यावर पडला याबाबत चर्चा सुरु आहे. घरच्यांना घाबरवण्यासाठी दिपकने यापुर्वी दोन ते तीन वेळा आत्महत्या करण्याचे नाटकही केल्याची माहिती पुढे आली आहे.