पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात, शांततेत पार पडाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का, १७ जणांवर तडीपारी तर ३ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
आगामी निवडणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस उपाययोजना करत आहेत. आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी, वाकड, निगडी पोलीस ठाण्यातील तीन टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. वाकड, दिघी आणि पिंपरी मधील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तर वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड आणि पिंपरी परिसरातील १७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक आणि दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरज किरवले टोळीवर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पोलिसांनी टोळी प्रमुख सुरज उत्तम किरवले (वय-२४ रा. घरकुल, चिखली), यश उर्फ कैलास भोसले (वय-२१, रा. रिव्हर रोड, पिंपरी), अविनाश प्रकाश माने (वय-२२, रा. बौद्धनगर, पिंपरी), गणेश जमदाड (भाटनगर, पिंपरी) यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे. आरोपींविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, पिस्टल बाळगणे असे सहा गुन्हे दाखल आहेत.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमन पुजारी टोळीवर खुनाच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी टोळी प्रमुख अमन शंकर पुजारी (वय २२), शिवम सुनिल दुबे (वय २१), रत्ना मिठाईलाल बरुड (वय 36, सर्व रा. पांढारकर वस्ती चौक, पंचतारानगर, आकुर्डी) यांच्या विरोधात कट करुन खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या घातक हत्यारे जवळ बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख रोहित खताळ याच्यासह १२ जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. रोहीत मोहन खताळ (वय २१, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), साहील हानीफ पटेल (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), ऋषीकेश हरी आटोळे (वय २१, रा. बेलठीकानगर, थेरगाव), शुभग चंद्रकांत पांचाळ (वय २३, रा. काळेवाडी), अनिकेत अनिल पवार (वय २७, रा. पवारनगर, थेरगाव), प्रितम सुनील भोसले (वय २०, रा. आदर्शनगर, काळेवाडी), शिवशंकर शामराव जिरगे (वय २२, रा. दत्तनगर, थेरगाव), सुमित सिद्राम माने (वय २३, रा. शिवराजनगर, रहाटणी), गणेश बबन खारे (वय २६, रा. थेरगाव), अजय भिम दुधभाते (वय २२, रा. पडवळनगर, थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (वय २१, रा. पवारनगर, थेरगाव), कैवल्य दिनेश जाधवर (वय १९, रा. उंड्री, हडपसर) यांच्या विरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यारे, पिस्टल जवळ बाळगणे असे एकूण १९ गुन्हे बीड, अहमदनगर आणि पिंपरी-चिंचवड येथे दाखल आहेत.
वाकड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार संदेश उर्फ शिलव्या लाजरस चोपडे (रा. अमरदिप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यार १४ गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ गुड्या संजय मेटकरे (रा. गणेशनगर कॉलनी, दिघी) याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर पिंपरी पोलीस ठाण्यातील दिपक सुरेश मोहिते (रा. नेहरुनगर) याच्यावर 10 गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
सराईत १७ गुन्हेगार तडीपार
* वाकड पोलीस स्टेशन
आनंद किशोर वाल्मिकी (वय-२९ रा. काळा खडक, वाकड) – २ वर्षे तडीपार
आशिष एकनाथ शेटे (वय-२४, रा. नखाते वस्ती, रहाटणी) १ वर्ष तडीपार
* देहूरोड पोलीस स्टेशन
रोहित उर्फ गबऱ्या राजस्वामी (वय- २२, रा. एमबी कॅम्प, देहुरोड) १ वर्ष तडीपार
ऋषिकेश उर्फ शेऱ्या अडागळे (वय-२४, रा. गांधीनगर, देहूरोड) २ वर्ष तडीपार
*महाळुंगे पोलीस स्टेशन
संकेत माणिक कोळेकर (वय-२२, रा. धामणे, ता. खेड) २ वर्ष तडीपार
* चिखली पोलीस स्टेशन
आकाश बाबु नडविन मणी (वय-२१ रा. मोरे वस्ती, चिखली) २ वर्ष तडीपार
* पिंपरी पोलीस स्टेशन
सुरज रामहरक जैस्वाल (वय २१, रा. नेहरुनगर पिंपरी) – २ वर्ष तडीपार
शुभम राजु वाघमारे (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) – २ वर्ष तडीपार
वृषभ नंदू जाधव (वय २१, रा. इंदिरानगर चिंचवड) –२ वर्ष तडीपार
शेखर उर्फ बका बाबु बोटे (वय २०, रा. इंदिरानगर चिंचवड) – २ वर्ष तडीपार
शुभम अशोक चांदणे (वय १९, रा. इंदिरानगर चिंचवड) – २ वर्ष तडीपार
शांताराम मारुती विटकर (वय ३४, रा. इंदिरानगर चिंचवड) – २ वर्ष तडीपार
अनुराग दत्ता दांगडे (वय १९, रा. इंदिरानगर चिंचवड) – २ वर्ष तडीपार
सागर ज्ञानदेव ढावरे (वय २०, रा. मिलींदनगर पिंपरी) – २ वर्ष तडीपार
पंकज दिलीप पवार (वय ३२, रा. चिंचवड) – २ वर्ष तडीपार
सोन्या उर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे (वय २१, रा. दत्तनगर चिंचवड) – २ वर्ष तडीपार
आनंद नामदेव दणाणे (वय ३१, रा. विद्यानगर, चिंचवड) – २ वर्ष तडीपार
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ बापू बांगर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निता उबाळे, गुन्हे शाखा पी.सी.बी सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जगदाळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटोळे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, शरद विंचु, गणेश सोनटक्के, ओंकार बंड यांच्या पथकाने केली.