सुरत: इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगने 19 फेब्रुवारी रोजी सूरतच्या वेसू रोडवरील हॅप्पी एलिगन्स अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सुरत पोलिसांनी सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक शर्माला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
कोण होती तानिया सिंग ?
28 वर्षांची तानिया सिंग ही प्रसिद्ध डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. तानिया सिंगचे सोशल मीडियावर अनेक चाहते होते. रिपोर्ट्सनुसार, तानियाचे इंस्टाग्रामवर 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तानियाच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ती डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल होती. 19 फेब्रुवारी रोजी 28 वर्षीय तानिया सिंगने सुरतच्या वेसू रोडवरील हॅपी एलिगन्स अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.
तानियाचे वडील…
तानिया सिंगच्या वडिलांचे नाव रामेश्वर सिंग पांडेसरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वरसिंग पांडेसरा हे जीआयडीसीमध्ये काम करायचे. वेसू स्टार गॅलेक्सीजवळील हॅप्पी एलिगन्स अपार्टमेंटमध्ये रामेश्वर सिंग पत्नी आणि मुलगी तानिया सिंगसोबत राहत आहेत. रामेश्वर सिंग यांना एक मुलगा असून तो कॅनडामध्ये राहतो.
पोलिसांचा तपास
तानियाने आत्महत्या केल्यानंतर सुरत पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटर अभिषेक शर्मा हा तानिया सिंगच्या संपर्कात होता आणि तानियाने अष्टपैलू क्रिकेटर अभिषेक शर्माला शेवटचा फोन केला होता, अशी माहिती मिळत आहे.
कोण आहे अभिषेक शर्मा?
अभिषेक शर्मा हा रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये पंजाब संघाकडून खेळला होता. अभिषेक शर्माने चार सामन्यांत १९९ धावा केल्या होत्या. यानंतर उत्कृष्ट खेळी केल्यानंतर अभिषेक शर्माला सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये कायम ठेवले.