लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ( ता. हवेली) येथील नेहा बाबासाहेब चव्हाण यांनी आरपीआय (आठवले गट) महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
लोणी काळभोर येथील एका कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) नवीन हवेली तालुका कार्यकारिणी रविवारी (ता.९) जाहीर करण्यात आली. यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी नेह चव्हाण यांची महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर केली.
यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्षा अरुणा हरपळे, पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, महिला आघाडीच्या मालन बनसोडे, बाबासाहेब मोरे, गजेंद्र मोरे आणि आरपीआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पदाच्या माध्यमातून समाजातील व्याप्त, भ्रष्टाचार , महिला उत्पीडन, महिला शोषण, भय, आतंकवाद व मानवाधिकार, हक्क यांसारख्या समस्या सोडविणार आहे. तसेच पूर्व हवेलीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडूननंतर बोलताना नवनिर्वाचित पूर्व हवेली तालुकाध्यक्ष नेह चव्हाण यांनी सांगितले आहे.