पुणे : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती पुन्हा आता चर्चेत आली आहे. आता तिच्या लग्नाला केवळ चार महिने झाले आहेत आणि तिने आई झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. तिने जून महिन्यात दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्न केले.
विग्नेशने हे फोटो शेअर करत, “नयन आणि मी आज आई-वडील झालो आहोत. आम्हाला दोन जुळी मुले झाली आहेत. आमच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रुपाने मिळाले आहेत. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.
उईर आणि उलगम” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. नयनताराच्या घरी दोन जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. विग्नेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.