अजित जगताप
वडूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारा जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. परंतु, बदलत्या काळानुसार राजकीय भूमिका व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी पुढे आलेले आदरणीय राष्ट्रवादीचे नेते तथा विधानपरिषद सभापती मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वा सातेवाडी ता खटाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला येत आहेत. आज होणाऱ्या राष्ट्रवादीचे रामराजेंच्या भाषणाकडे खटाव-माण चे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा. श्रीनिवास पाटील,आमदार बाळासाहेब पाटील, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,आमदार शशिकांत शिंदे,श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी अशी सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या मेळाव्याला सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यासाठी खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.असे राष्ट्रवादी खटाव तालुक्यातून आवाहन केले आहे. अनेक माध्यमातून भाजप सातारा जिल्हाध्यक्ष व खटाव-माणचे आमदार जयकुमार गोरे,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सभापती रामराजे नाईक निंबाळकर समर्थकांनी रावण दहन विसरून विरोधी नेत्यांचे पुतळे जाळण्याचा एक कलमी कार्यक्रम सादर केला आहे. त्यातच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून एकमेकांचा सात-बारा मांडून चांगलेच आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर वडूज ता खटाव नजिक सातेवाडी हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होत आहे.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना यानिमित्त सडेतोड उत्तर देण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहेत. त्यांचे जावई राहुल नार्वेकर हे भाजप आमदार आहेत.तरी ही भाजप ला विरोध करताना त्यांनी भाजपच्या खासदार-आमदारांवर शेलक्या शब्दात रामबाण सोडले आहेत.रामराजे निंबाळकर फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले.
अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. राज्यातील अपक्ष 22 आमदारांची मोट बांधून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले.१९९९ रामराजे राष्ट्रवादीसोबत गेले होते. महसूल , कॅबिनेट मंत्रिपदी भोगले. वर्णी लागली. साताऱ्याचे पालकमंत्री, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष , विधान परिषदेचे सभापती अशी मोठी पदे त्यांना प्राप्त झाली आहेत.
विरोधकांना समजून घेणे, बोटचेपीचे धोरण अवलंबिणे असे ते कधी वागले नाही, उलट, सर्वांना मदत करताना जे विरोधाला विरोध करीत आहेत, त्यांचा शाब्दिक समाचार घेताना त्यांनी कोणालाही सोडले नाही.आज होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य व राजकीय विरोधकांना बारीक चिमटे ते कसे घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सातेवाडी येथील मधुमाला मंगल कार्यालयात मेळावा होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे.