लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील मारुती दादा कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हवेली तालुक्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकला सोनकांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार सोहळा व हवेली तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी हे पत्र मारुती कांबळे यांना देण्यात आले.
यावेळी पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, विक्रम शेलार, पंकज दादा धिवार, पुणे जिल्हा उपाध्यक्षा अरुणा हरपळे, पुणे जिल्हा युवकाध्यक्ष प्रविण ओव्हाळ उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन गजेंद्र मोरे, मारूती दादा कांबळे, बापूसाहेब गायकवाड, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, नायगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल शेलार, दिपक आडागळे, शकिल शेख, अभिजित पाचकुडे, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निवडीनंतर मारुती दादा कांबळे म्हणाले, “शाहू फुले आंबेडकरांचे व आठवले साहेबांचे विचार घरोघरी पोहोचविणार तसेच हवेली तालुक्यामध्ये पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करून सर्वसामान्यासाठी न्याय देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.”