पुणे – हॉटेल बुकिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणाला तब्बल एक लाखाला पडला महागात सायबर चोरट्यांनी त्यांच्याा खात्यातून ९४ हजार ७०० रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती येथे राहणार्या एका ३० वर्षाच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासह गोव्याला फिरायला जाण्याच्या विचार केला. त्यासाठी त्याने हॉटेलच्या बुकींगकरीता कॅरावेला बीच रिसॉर्टच्या होम पेजवरील मोबाईल क्रमांकावर फोन केला. तो नंबर नेमका सायबर चोरट्यांचा निघाला. त्या फोनवर सक्सेना असे नाव सांगण्यात आले. त्यानंतर त्याला हॉटेल बुकींगसाठी २५ हजार रुपये अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्याने सांगितलेल्या खात्यावर २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर बुकींग रिसीट जनरेट करण्यासाठी गुगल पे ट्रान्झेक्शन फिचरचा वापर करुन त्यावर त्यांना रिसीट नं. ३९८५० व २९८५० असे बुकींग आयडी टाकण्यास सांगितले.
दरम्यान, त्याने सागितले तसे केल्यावर त्यांच्या खात्यातून ३९ हजार ८५० रुपये व २९८५० रुपये कट झाले. अशा प्रकारे एकूण ९४ हजार ७०० रुपयांची त्यांची फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनात आले. याप्रकरणी त्याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत