पिंपरी-चिंचवड : क्रिएटिव्ह अकॅडमी संस्थेचा चालक नौशाद शेख याने आत्तापर्यंत अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून त्याच्या संस्थेच्या अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
अतिक्रमणाची ही कारवाई शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) रोजी करण्यात आली. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण ज्या हॉस्टेलमध्ये करण्यात आले. तेथील बरेचसे बांधकाम अनधिकृत असल्याची बाब उघडकीस आल्यावर महापालिकेने ही कारवाई केली आहे.
अत्याचारांच्या घटनेचा इतिहास
नौशाद शेख याने 2 फेब्रुवारी 2024 रोजी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी नौशाद याला अटक करण्यात आली आहे. त्याआधी 2022 मध्ये नौशाद शेख याने फ्लॅटवर बोलवून विद्यार्थीनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलीने प्रतिकार केला आणि पळ काढला. त्यानंतर त्याने तुझे येथील मुलांसोबत संबंध असल्याचे तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी पीडितेला देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या मुली समोर पीडितेला अश्लील शेरेबाजी केली होती. तिला अश्लील शेरेबाजी केली होती. त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.
10 वर्षांपूर्वीही झाली होती अटक
अकॅडमीतील दुसऱ्या एका माजी विद्यार्थीनीनेही शेख याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याशिवाय, 10 वर्षांपूर्वी 30 ऑक्टोबर 2014 रोजी अकॅडमीतील एका विद्यार्थीनीवर लौंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका विद्यार्थीनीने केली होती. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी शेख याला बेड्या ठोकल्या होत्या.