पुणे : आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे, असा सल्ला अजित पवार यांनी तरुणांना दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू, असं अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असा सपाटाच लावला आहे. याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत.
मुख्यमंत्री करण्याचं आपलं स्वप्न : भुजबळ
अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचं आपलं स्वप्न आहे. यासाठी अल्पसंख्याक ही सोबत घेऊन जावं लागणार आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये. जीभ घसरली तर अवघड होतं. शांततेत काम करावं लागणार असून अजित दादांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचं असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचे वादळ उठलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली सर्वांचीच भूमिका आहे. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात नवा कायदा येत असून त्याला आपला खंबीर पाठिंबा आहे. असही छगन भुजबळ म्हणाले.