अमेरिका : अमेरिकेत भारतीय वंशाचा विद्यार्थी समीर कामत याचा मृतदेह जंगलात आढळला आहे. वॉरेन काऊंटी पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच आणखी एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. तो देखील पर्ड्यू विद्यापीठातच शिक्षण घेत होता. यूएसमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याची वर्षभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे या मृत्यूंकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
भारतीय वंशाचा २३ वर्षीय विद्यार्थी समीर कामत याचा मृतदेह क्रोज ग्रोव्ह नेचर प्रिझर्व्हच्या जंगलात बेवारसरित्या आढळून आला. समीर हा डॉक्टरेट होता आणि पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत होता. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच आणखी एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. तो देखील पर्ड्यू विद्यापीठातच शिक्षण घेत होता. मागच्या दोन आठवड्यांतली ही चौथी घटना आहे. समीर कामतचा मृतदेह आम्हाला सोमवारी संध्याकाळी ५ वाजता आढळला, असे पोलिसांनी सांगितले आहे. समीर कामतच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच लोकांनी या घटनांमुळे घाबरुन जाऊ नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
समीर कामत याने पर्ड्यू विद्यापीठ येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याने मास्टर्सही पूर्ण केले. त्यानंतर तो डॉक्टरेट होण्यासाठी शिकत होता. त्याच्या मृत्यूबाबत एक पत्रक काढण्यात आले आहे. ज्यामध्ये समीर कामतच्या डोक्यात गोळी झाडली गेल्याची जखम आहे आणि आत्महत्या केल्याने त्याचा मृत्यू झाला असा उल्लेख आहे.
त्याच्या मृत्यूमूळे खळबळ उडाली असून, वॉरन काउंटी कॉरोनरचे कार्यालय आणि शेरीफच्या कार्यालयासह पोलिसांकडून त्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. क्रॉफर्ड्सविले येथे मंगळवारी दुपारी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.
पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या नील आचार्य या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा नुकताच मृत्यू झाला. तो अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यान, विवेक सैनी हा आणखी एक भारतीय वंशाचा विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तो देखील पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत होता. जॉर्जियामध्ये पदव्युत्तर पदवी घेत असलेला हा २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी कामावर असताना एका बेघर व्यक्तीच्या जीवघेण्या हल्ल्याला बळी पडला. ज्याचा व्हिडिओही पुढे आला होता. अशीच आणखी एक घटना घडली होती, ज्यामध्ये श्रेयस रेड्डी नावाच्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. हा विद्यार्थीसुद्धा ओहायो येथे मृतावस्थेत आढळला.
अमेरिकेत होणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत भारत सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले होते की अमेरिकेचं सरकार अमेरिकेत असलेल्या इथल्या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरु करणार आहे. हैदराबादच्या सय्यद मजहर अलीवर शिकागोमध्ये हल्ला झाला. त्यानंतर श्रेयस रेड्डी या विद्यार्थ्यावर ओहायो मध्ये हल्ला झाला. या गोष्टी चिंता वाढवणाऱ्या आहेत असंही रेड्डी म्हणाले होते. तसंच केंद्र सरकारने त्यांना मदत करावी आम्ही साथ देऊ असंही रेड्डी म्हणाले.