पिंपरी: ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून चक्क मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे सौदागर परिसरात सोमवारी 5 फेब्रुवारीला घडला. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदिपान फड ऊर्फ फड आबा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने आरोपीला ऊस तोडणीचे पैसे दिले नाहीत म्हणून फिर्यादीच्या 20 वर्षीय मुलाचे आरोपीने अपहरण करून डांबून ठेवले होते. फिर्यादी यांचे पती हे कॅब चालक असून ते कामावरती गेले असता आरोपीने फिर्यादीकडे पैशांची मागणी करत मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.