नांदेड : एका धार्मिक सोहळ्यामध्ये भंडार्याच्या जेवणामुळे सुमारे २००० हजार लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर नांदेडमधून समोर आली आहे. लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. तो खाल्ल्यानंतर रात्री २ च्या सुमारास त्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली.
अनेकांना डोकेदुखी, उलटीचा त्रास जाणवू लागला. सोबतच काहींना चक्कर येत होती. त्यामुळे या लोकांना लोहा शहरात शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रसादामध्ये भगर म्हणजे वरईचा भात होता.
हजारो भाविकांना प्रसाद घेतल्यानंतर त्रास जाणवू लागला. त्यानंतर भाविकांना शासकीय आणि खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हा महाप्रसाद घेण्यासाठी सावरगाव, नसरत, रिसनगाव, हरणवाडी, आष्टूरसह गावातील हजारो लोक आले होते. एसटी बस, खासगी वाहने ट्रॅव्हल्स जीप यांच्या मदतीने रुग्णांना नांदेड, कंधार व अहमदपूर, पालम येथे रुग्णालयात पाठवण्यास सुरूवात केली.