लहू चव्हाण
पाचगणी : श्री केदारेश्वर देवस्थानांमुळे दांडेघर गावाला वेगळे महत्व असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले.
दांडेघर (ता. महाबळेश्वर) गावातील समाजमंदीराचे भूमिपूजन राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी राजपूरे बोलत होते.
यावेळी युवा नेते नितिन भिलारे, जावली बँकेचे संचालक अजित कळंबे, अमोल भिलारे, ठेकेदार आबा पाटिल, सरपंच सृष्टी खरात, उपसरपंच जनार्दन कळंबे , पोलीस पाटिल, योगिता खरात, पाचगणी सोसायटीचे चेअरमन शंकरराव कळंबे, रमाकांत कळंबे, पांडूरंग कळंबे, मनोज कळंबे, सुभाष कसूर्ड़े, गजानन पवार, ज्ञानेश्वर कळंबे, अशोक कसूर्ड़े, रमाकांत वाडकर, गजानन कळंबे, चंद्रकांत पवार तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
राजपूरे पुढे म्हणाले महाबळेश्वर तालुक्याच्या विकासासाठी जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या माध्यमातून विकासाची गंगा गावोगावी पोहोचवली आहे. स्व.बाळासाहेब भिलारे यांनी एकही गाव विकासापासून दूर ठेवले नाही आम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एकही गाव विकासापासून वंचित ठेवणार नाही. दांडेघर गाव हे महाबळेश्वर तालुक्याचे प्रवेशद्वार असून या गावाला वेगळी ओळख आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या गावाचा विकास होणे गरजेचे असल्याचे यावेळी प्रास्ताविकात चंद्रकांत पवार यांनी सांगितले. तर शंकरराव कळंबे यांनी आभार मानले.