पुणे : अल्पवयीन मुलीशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा परिसरात घडला. हा प्रकार पीडित मुलीच्या घरात तसेच शिर्डी, दिल्ली व अंबरनाथ येथे घडला.
याबाबत मुंढवा परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी (ता. ४) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मनीष सुजीत नागपुरे (वय-२७, रा. मुंढवा पोलीस चौकी मागे, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीसोबत मैत्री केली. तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन मुलगी असताना देखील लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबध ठेवले. तसेच तिला फिरायला घेऊन जात तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हडपसर पोलिसांनी हा गुन्हा मुंढवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महानोर करीत आहेत.