सध्या अमोल कोल्हेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात अमोल कोल्हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आदी मुद्यांवरून सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी त्यांनी कवितेतून आपलं मत मांडलं. मोदी सरकारने केवळ स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे रामलल्लांची अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्याचा आरोप त्यांनी या कवितेतून केला.
त्याच व्हिडीओवर ‘झिम्मा’ फेम दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपलं मत मांडलं आहे. अमोल कोल्हेंच्या सभागृहातील कवितेवर राजकीय क्षेत्रासह मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया आल्या आहेत. यासंदर्भात हेमंत ढोमे याने त्याच मत मांडत एक्स अकाऊंटवरून मत मांडलं आहे.
“आपला विरोध असू शकतो, आपला पाठींबा सुद्धा…काही मतं आपल्याला यांची पटतात.. काही त्यांची… काही गोष्टी पटत नाहीत म्हणून विरोध, काही पटतात म्हणून कौतुक सुद्धा! यालाच लोकशाही म्हणतात! मुद्देसूद पध्दतीने, शालीनतेने आपलं मत मांडता येतं आणि मनं जिंकता येतात! वाह, वाह!” अशी एक्स पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने अमोल कोल्हे यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनातील व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, हेमंत ढोमे यांनी शेअर केलेल्या या एक्स पोस्टवर नेटकऱ्यांनी “हेमंत भाऊ अगदी बरोबर…”, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारतीय संविधानाने दिलेल्या सुवर्ण अधिकारांपैकी एक अधिकार.”, अशा कमेंट्स करत आपलं मत मांडलं आहे.
आपला विरोध असु शकतो, आपला पाठींबा सुद्धा…
काही मतं आपल्याला यांची पटतात… काही त्यांची…
काही गोष्टी पटत नाहीत म्हणुन विरोध, काही पटतात म्हणुन कौतुक सुद्धा!यालाच लोकशाही म्हणतात!
मुद्देसूद पध्दतीने, शालीनतेने आपलं मत मांडता येतं आणि मनं जिंकता येतात! वाह, वाह! #AmolKolhe pic.twitter.com/pUWmsHO4Ql
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) February 3, 2024
अमोल कोल्हे यांच्या कवितेतील काही ओळी
चल पडे हम अयोध्या की ओर रामलल्ला के दर्शन की आस लगाए, जो सामने नजारा देखा वो देख कर दंग रह गए, वो तीन मंजिले ४०० खंबे- ३२ सिडियाँ, जय श्रीराम का नारा लगाते हुए हम सिडियाँ चढने लगे, रामलल्ला से क्या गुहार लगाए ये सोचने लगे, पहली सीडी पर याद आई महंगाई, दुसरी पर देश में बढती बेरोजगारी, तिसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकता, चौथी पर सेंट्रल एजन्सी की संदिग्ध भूमिका, हर सिडी पर कुछ ना कुछ याद आ रहा था, कही १५ लाख का जुमला, कही किसानों का आक्रोश था, कही महिला कुस्तिगरों की वेदना थी, कही सालाना २ करोड रोजगारों का वादा था, कही बढती सांप्रदायिकता थी, तो कही चुनिंदा पुंजीपतीयों पर मेहरबान हमारी सरकार का चेहरा था..