पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्याला काही आजार उद्भवू नये यासाठी सर्वच जण काहीना काहीतरी उपाय करत असतात. आरोग्याकडे विशेष लक्ष देत असतात. नियमित व्यायाम, आहार, आरोग्य तपासणी याकडे लक्ष दिले जाते. पण असे काही आजार आहेत ते काही केल्या उद्भवतातच. त्यापैकी एक म्हणजे मुतखडा अर्थात किडनी स्टोन.
मूतखडा तयार होण्यास अनेक कारणे असली तरी पाणी कमी पिण्याने मूतखडा होण्याचे प्रमाण वाढत राहते. याशिवाय अति शारीरिक श्रम किंवा व्यायाम या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मूतखडा तयार होतो. मूत्रमार्गात होणाऱ्या जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मूतखड्यात रूपांतर होते. मांसाहार जास्त प्रमाणात केल्याने मूतखडा होतो.
मुतखडा होण्यामागची अनेक कारणं असू शकतात. पण जेव्हा याचा त्रास सुरु होतो तो असह्य होतो. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो. मुतखड्यामुळे वेदना, किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवी वाहून येणाऱ्या नलिका म्हणजेच युरेटरमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामुळे त्रास जाणवत नाही; मात्र, किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात.
कॅल्शियम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करणे आवश्यक आहे. त्यातच तुळशीचा चहा ऍसिटिक ऍसिडचा उत्तम स्त्रोत आहे. किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. तसेच जेवणामध्ये दूध, दही, चीज आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते.