नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात नवनवे स्मार्टवॉच, स्मार्टटीव्ही आहेत. असे असताना आता प्रसिद्ध कंपनी सॅमसंगने एआयवर चालणारे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. सॅमसंगने आपला 2024 सालचा स्मार्ट टीव्ही लाइन-अप लाँच केला.
सॅमसंगने वेगवेगळ्या स्क्रीन साईजमध्ये टीव्ही लाँच केले आहेत. या टीव्हीमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ओएलईडी टीव्हीमध्ये एस 95 डी प्रोसेसर आहे. हा टीव्ही 77 इंचापर्यंतच्या आकारात उपलब्ध असेल, जो आधीच्या व्हर्जनपेक्षा 20 टक्के शाईनसह असणार आहे. या टीव्हीचा स्क्रीन 144 हर्ट्ज् रिफ्रेश रेट सपोर्टसह येणार आहे.
याशिवाय, पारदर्शक डिस्प्ले, मायक्रो एलईडी चिप्सचा वापर करण्यात आला. वायरलेस कनेक्टिव्हिटीसह येतो. सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्हीमध्ये कंपनीने अनेक फीचर्स जोडले आहेत. निओ क्यूएलईडी टीव्ही सीरिजमध्ये कंपनीने सॅमसंगचा नवा एनक्यू 8 एआय जेन 3 प्रोसेसर दिला आहे.