Soybean Rate : लातूर : सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही कमी झाल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम होताना दिसतोय. मराठवाडा विभागात 48 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. विदर्भात 55 लाख हेक्टर तर उर्वरित राज्यात 50 लाख हेक्टरवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.
केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण, त्यातच जागतिक पातळीवर सोयाबीनचे भरघोस उत्पादन याचा फटका राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. येणाऱ्या काळातही सोयाबीनचे दर वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे मुख्य पिक सोयाबीनवरच सर्व भिस्त असते.
मंगळवारी हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळाला. तब्बल तीन वर्षानंतर ही स्थिती बाजारपेठेत आलेली पहावयास मिळत आहे. सोयाबीनचा दर 4,600 च्या खाली गेला होता.
सोयाबीनचा दर का पडला?
– केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयात धोरणात देशी शेतकऱ्यांचा विचार करण्यात आला नाही.
– गतवर्षी आयात शुल्क हे 40 ते 45 टक्के होती. मात्र ह्या वर्षी आयात शुल्क 5.50 टक्क्यांवर आली आहे
– केंद्र सरकारने आफ्रिकन देशाबरोबर केलेल्या करारानुसार पाच लाख टन सोयाबीन देशामध्ये दाखल झाले आहे.
– हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असताना ही सरकार खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मनस्थितीत नाही
– ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये सोयाबीनचे भरघोस उत्पादन झाला आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे.
– परदेशातून सूर्यफूल डीओसी मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. मात्र, त्याच वेळेस भारतातून सोयाबीन डीओसी निर्यात करण्याबाबत स्पष्ट धोरण नाही.