बिहार : बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा देऊन विद्यमान सरकार विसर्जित केलं होतं.
पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. सकाळी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या काहीतासात त्यांनी पुन्हा नव्या सरकारसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत.
या सरकारमध्ये भाजपने विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांच्यानंतर शपथ घेतली आहे.
या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सम्राट चौधरी (भाजप)
विजय कुमार सिन्हा (भाजप)
डॉ. प्रेम कुमार (भाजप)
विजय कुमार चौधरी (जेडीयू)
बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)
श्रावण कुमार (जेडीयू)
संतोष कुमार सुमन (HAM)
सुमित कुमार सिंग (अपक्ष)
नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. नव्या सरकारला जीतनराम मांझी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडे चार आमदार आहेत.
बिहारमधील संख्याबळ
आरजेडी – 79,
भाजप – 78
जेडीयू – 45
काँग्रेस – 19
CPI(ML)L – 12
हम – 4
सीपीआय -2
सीपीआयएम- 2
अपक्ष,इतर – 1
एमआयएम – 1
एकूण – 243