पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शारिरीक संबंध ठेवण्याला नकार दिल्याने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. येवलेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन प्रथमेश गुळवे याच्यावर आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुणी आणि प्रथमेश गुळवे यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. यानंतर तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्रथमेश गुळवे याने अप्रत्यक्षरित्या तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली. आरोपीने फिर्यादीला कात्रज चौकात बोलावून घेत शारीरिक सुखाची मागणी केली. त्यावेळी तिने त्याला नकार दिला असता आरोपीने तरुणीचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅप वर व्हायरल केला. यामुळे तरुणीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होऊन आरोपीने तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, तरुणीने नकार दिल्यानंतर तरुणीचा व्हिडीओ प्रथमेशने मॉर्फ केला. त्यानंतर हा व्हिडीओ थेट सोशल मिडीयावर व्हायरल केला. हे लक्षात येताच तरुणीने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. हा प्रकार ११ डिसेंबर २०२३ रोजी इंस्टाग्राम अकाऊंटवर घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.