Side Effect Of Salt : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने अनेकवेळा मिठाच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. टेबल सॉल्टमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे सेवन केल्यावर अनेक दुष्परिणाम होतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, मिठातून सोडियम जास्त प्रमाणात घेतल्याने १.८९ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. यावरून हे स्पष्ट होते की मीठ खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.
टेबल सॉल्टमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त प्रमाणात मीठ वापरल्यास शरीरात हळूहळू पाणी जमा होऊ लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांवर दाब वाढू लागतो. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि हृदयाघाताचा धोका वाढण्याची शक्यता असते.
जास्त मीठ खाल्ल्याने किडनीशी संबंधित आजार होतात. या स्थितीत किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. यासोबतच किडनी निकामी होण्याचा धोकाही वाढतो. तसेच हाडे कमकुवत होऊन आतून पोकळ होऊ लागतात. त्यामुळे पाठदुखी, गुडघेदुखी यासारख्या समस्या लहान वयातच वाढतात. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नुसार निरोगी व्यक्तीने दररोज ५ ग्रॅम मीठ खावे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दिवसभरात १ चमचेपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.