पुणे : भारतात सक्रीय रुग्णभार सध्या 1,32,457 इतका आहे, तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.30% इतका आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.49% आहे.गेल्या 24 तासांत 15,447 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,30,11,874 झाली आहे.
गेल्या 24 तासात 16,906 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.गेल्या 24 तासात एकूण 4,59,302 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.77 (86,77,69,574) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.26% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.68% आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.12 (1,99,12,79,010) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,61,58,303 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.76 (3,76,28,293) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.