पुणे : गेले काही दिवस वाढलेला थंडीचा पारा पुन्हा घसरला आहे. शिवाजीनगरमध्ये 9.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर हवेलीमध्ये ८.७ वर तापमान घसरले आहे. किमान तापमानात आणखी घट होणार असून, पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका असल्याने महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यातच शहरातील आकाश निरभ्र झाल्यावर हवामान कोरडे झाले आहे. थंड वाऱ्यांना अडथळा नसल्यामुळे थंड वाऱ्यांच प्रभाव शहराच्या वातावरणावर झाला आहे. त्यामुळे गेले दिवस दिवस किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात कडाक्याची थंडी
पुणे जिल्ह्यात कडाक्याची थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २ दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. शहरातील ठिकाणावरील तापमान १० ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटविल्या जात आहे. थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही वाढले आहे.
हडपसर, खेड,चिंचवड, आबेगाव, बालेवाडी, इंदापूर, पाषाण, माळीण, एनडीएसह अनेक ठिकणाचा पारा प्रचंड घसरला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. पुण्यातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. एनडीए, पाषाण आणि हवेली भागातील तापमान ९ च्या आसपास आले आहे.
पुणे जिल्ह्यातील तापमान?
वडगावशेरी-१७.५
मगरपट्टा-१६.८
लव्हाळे -१६.६
खेड-१५.५
चिंचवड-१५.५
आंबेगाव-१४.९
गिरीवन-१३.४
दापोडी-१३.३
बालेवाडी-१२.९
नारायणगाव-१२.९
हडपसर-१२.८
शिरुर-१२.८
डुडुळगाव-१२.४
भोर-१२.४
लोणावळा-१२.३
तळेगाव-११.९
ढमढेरे -११.१
पुरंदर -११.०
दौंड -१०.९
लवासा१-१०.८
इंदापूर-१०.५
पाषाण-१०.१
निमगिरी-९.९
बारामती-९.८
राजगुरुनगर-९.७
शिवाजी नगर-९.७
हवेली-८.७
एनडीए-८.२
माळीण-८.२