पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळ बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी उत्त्रांचे आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येणार आहे.
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असतो. त्यावर त्यांच्ये भविष्यातील शिक्षण, नोकरी अवलंबून असते. परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात आला होता.
फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांचा वेळी विद्यार्थ्यांनी अर्धातास अगोदर परिक्षा दालनात उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. सकाळ सत्रात सकाळी 11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दु.3.00 वाजता परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सकाळच्या सत्रात 10.30 वाजता तसेच दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येणार
परीक्षेचा सध्याचा वेळ परीक्षेची सुधारीत वेळ
सकाळी 11 ते दुपारी 2 सकाळी 11 ते दुपारी 2:10
सकाळी 11 ते दुपारी 1 सकाळी 11 ते 1:10
सकाळी 11 ते दुपारी 1.30 सकाळी 11 ते दुपारी 1.40