पुणे : येरवडा महिला कारागृहात कारागृह उपमानिरीक्षक, पश्चिम विभाग स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जानेवारी रोजी रोटरी क्लब यांच्यामार्फत कारागृहातील महिला बंद्याना 1000 रियुजेबल सॅनिटरी क्लोथ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी क्लब, पुणे पश्चिम यांचे अध्यक्ष विपीन घाटे तसेच संस्थेचे सदस्य वैशाली गदरे, माधुरी घाटे, वैजंयती पाथारकर, अनिल सपरे, निरंजन मथुरे हे उपस्थित होते. संस्थेचे वैजंयती पाथारकर यांनी सॅनिटरी क्लोथचा वापर कसा करायचा, याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ उपस्थीत होते. कारागृह उप-अधीक्षक श्रीमती पल्लवी कदम यांनी कार्यक्रमांच्या शेवटी संस्थेच्या सर्व सदस्याचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका श्रीमती ऋणाक्षी गवळी यांनी केले. कार्यक्रमास महिला तुरुगांधिकारी आर.ए. खिलारी व पोर्णिमा पालोदकर, प्रयास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हिना सय्यद व महिला कर्मचारी उपस्थित होते.