नवी दिल्ली: आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल असल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून या तारखेची नोंद केली असल्याचे आयोगाने सांगितले. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार ही थांबणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आले होते. त्यानंतर देशात एकच चर्चा सुरु झाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 16 एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून गृहीत धरल्याचा उल्लेख होता. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्या माध्यमातून 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
व्हायरल होत असलेल्या पत्रामध्ये काय म्हटलंय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 घोषित केला आहे. ही अधिसूचना दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ‘भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन’ असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने ते थोड्याच वेळात ट्विटरवर पोस्ट केले होते.