आदित्य ठाकरे म्हणाले, जिमला घेऊन राजकीय रंग नको द्यायला. आज जिमची तरुणांना गरज आहे. तरुण फिटनेसला घेऊन जागरूक आहेत. सायकलिंग, मॅरेथॉन, रनिंग तसेच जिमला तरुण प्राधान्य देत आहेत. ही काळाची गरज आहे. जिम आणि देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नाही. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पुढे ते बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे हे लवकरच शिवनेरीवर येणार आहेत. २०१८ साली जेव्हा राम मंदिराचा मुद्दा आम्ही उचलला आणि भाजपला याचा विसर पडला होता. आम्ही कायदा आणा, या मागणीवर ठाम होतो. योगायोग असा की शिवनेरी किल्ल्यावरून मूठभर माती आपण अयोध्येला नेली आणि त्यानंतर पुढच्या नोव्हेंबरमध्ये मंदिराचा निकाल लागला होता. ही भावना आमच्या मनात आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा शिवनेरी गडावर उद्धव ठाकरे नक्की जातील आणि तिथली मूठभर माती घेऊन अयोध्येला लवकरचं जाऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.