पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १५ पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील प्रमुख तीन हल्लेखोरांसह सहा आरोपींना कडेकोट बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एसी बिराजदार यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी देत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली.
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील तीन हल्लेखोरांसह एकूण सहा आरोपींना शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एसी बिराजदार यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. चौदा दिवसांच्या कोठडीत चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता आता सर्व आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.
साहिल पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गंडाळे, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांना पुणे पोलिसांनी पाच जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीनुसार, त्यांनी पूर्ववैमनस्य आणि शेतीच्या वादातून शरद मोहोळचा खून करण्याचा कट आखला होता. त्यानुसार पाच जानेवारी रोजी आरोपी पोळेकर व त्याच्या साथीदारांनी मोहोळ येथे त्याच्या राहत्या घराजवळ गोळीबार केला होता. तर त्याच दिवशी रात्री उशिरा पुणे-सातारा रोडवरील शिरवळजवळील किकवी येथून दोन वकिलांसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती.