पुणे प्राईम न्यूज डेस्क: फळे, पालेभाज्या खाण्याचा नेहमी सल्ला दिला जातो. याने आपल्याला आवश्यक घटक मिळतात. त्यात फळांमध्ये सफरचंद खाण्याचे म्हटले जाते. सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.
सफरचंदांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे किंवा ज्यांना कमी दिसत आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदांचा समावेश नक्की करावा. सफरचंद नेहमी साल न काढता खावे. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते.
याशिवाय सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णही आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकतात. सफरचंद हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्ही रोज एक सफरचंद खावे. यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.