नवी दिल्ली : सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगात जवळपास सर्वच गोष्टी डिजिटल, स्मार्ट झाल्या आहेत. मग त्यात स्मार्टफोन असो स्मार्टवॉच असो किंवा स्मार्ट टीव्ही सध्या बरंच स्मार्ट होत आहे. टीव्हीही काळाबरोबर स्मार्ट झाले आहेत. आता या स्मार्ट टीव्हींमध्ये बेस्ट पिक्चर क्वालिटी तर असतेच शिवाय आवाज अर्थात साऊंडही चांगला असतो.
अनेकांना स्मार्ट टीव्ही घेण्याची इच्छा असते. पण, बजेट कमी असल्याने घेता येत नाही. पण, असे काही स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत जे तुम्हाला ऑनलाईन खरेदी केल्यास दहा हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करता येऊ शकणार आहेत. आज त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
Acer HA240Y 23.8 Inch तुम्हाला हा IPS अल्ट्रा स्लिम टीव्ही नक्कीच आवडेल. हा टीव्ही 6.6 मिमीचा आहे आणि एलईडी बॅक लाईट टेक्नॉलॉजीसह येतो. हा टीव्ही फ्रेमलेस तर आहेच. त्यामुळे व्हिज्युअल अर्थात चित्र चांगले दिसते. टिल्ट अॅडजस्टमेंटसह या टीव्हीची आवाजाची गुणवत्ताही चांगली आहे. या टीव्हीमध्ये Sony Liv, Prime, Zee5, YouTube सारखे पर्याय देण्यात आले आहेत. ही टीव्ही फ्लिपकार्टवर 7,666 रुपयांना मिळू शकणार आहे.
Kodak 60 cm (24 inches) Special Edition
चांगला साउंड आउटपुट असलेला हा टीव्ही 60 Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात दोन HDMI आणि 2 USB पोर्ट देखील आहेत. यात अल्ट्रा ब्राइट स्क्रीन देण्यात आली आहे. हा टीव्ही 512 एमबी रॅम आणि 4 जीबी रॉम देतो. या घरगुती उपकरणामध्ये टिकाऊ A+ ग्रेड DLED पॅनल देखील देण्यात आले आहेत.
VW 80 cm (32 inches) Frameless Smart LED TV
VW 80 सेमी (32 इंच) फ्रेमलेस सीरीज HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही हा आणखी एक स्वस्त स्मार्ट टीव्ही आहे, ज्याची किंमत तुमच्या स्मार्टफोनपेक्षा कमी आहे. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या भिंतीवर फ्लॅट स्क्रीन टीव्ही हवा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय त्याची स्क्रीनही आधीच्या टीव्हीपेक्षा मोठी आहे. यामध्ये वाय-फाय, अँड्रॉइड, स्क्रीन मिररिंग, पीसी कनेक्टिव्हिटी असणार आहे. ही टीव्ही अॅमेझॉनवर 6,777 रुपयांना मिळू शकणार आहे.