नवी दिल्ली: उत्तर भारतातील अनेक भागात गुरुवारी (11 जानेवारी) दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये त्याची तीव्रता खूपच कमी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असून येथे त्याची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. गुरुवारी दुपारी २.५० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलच्या ईशान्येला २४१ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. दिल्ली आणि एनसीआरमधील लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
#WATCH | Earthquake of magnitude 6.1 on Richter scale hits Afghanistan, tremors felt in North India.
(Visuals from Poonch, J&K) pic.twitter.com/kMTT2XxYQ7
— ANI (@ANI) January 11, 2024