Winter Joint Pain Causes : मुंबई :थंडी वाढताच संधेदुखी, गुडघेदुखी, असे त्रास जाणवू लागतात. जुन्या दुखण्याचा त्रास वाढतो. एका रिपोर्टनुसार, थंडीमध्ये आपल्या शरीरावर अधिक दबाव निर्माण होतो. यामुळे अनेकदा स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवतात, असे सांगण्यात आले आहे.
अनेकदा अपघातामुळे हाडांना इजा झाली किंवा मार बसला असेल तर हिवाळ्यात ते दुखणे जास्त जाणवते. बॅरोमेट्रिक दाबाच्या या घसरणीमुळे शरीरातील मऊ ऊतींना सूज येते आणि सांध्यावर दबाव येतो, ज्यामुळे नसांनाही वेदना जाणवतात. हिवाळ्यात सांधेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे थंडी असते. स्नायूंच्या एकाकी होणाऱ्या हालचालीमुळे कडकपणा येतो. हिवाळ्यात आपल्या शरीरातील वेदना रिसेप्टर्स अधिक संवेदनशील होतात, ज्यामुळे आपल्या आधीच तीव्र वेदना जाणवतात.
‘हे’ उपाय करुन पाहा
हिवाळ्यात शरीराची हालचाल सक्रिय ठेवणे गरजेचं आहे. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. हिवाळ्याच्या महिन्यात बरेच लोक शारीरिक हालचाली टाळतात. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे सांधे, स्नायू आणि ऊतींमध्ये कडकपणा येऊ शकतो आणि जुनी दुखणी वाढू शकतात. रोज 30 मिनीटे चाला. त्याशिवाय भरपूर पाणी प्या, गरम पाणी पिणे उत्तम. 30 मिनीटे व्यायाम करा. थंड पदार्थ खाणं टाळा.
सांधेदुखी वाढण्यामागचं खरं कारण काय?
थंडीमुळे वातावरणातील तापमानात घट होऊ लागते, त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांवर दबाव वाढतो. विशेषत: गुडघे आणि घोट्यांभोवती दबाव वाढतो. जेव्हा थंड वातावरण असते तेव्हा बॅरोमेट्रिक हवेचा दाब वेगाने कमी होतो.वायू आणि द्रव गुडघे आणि घोट्याभोवती वेगाने पसरू लागतात. हे द्रवपदार्थ जसजसे परसतात, तसतसे ते एकत्र गोळा होऊन मज्जातंतूंवर दबाव टाकतात. ज्यामुळे जुन्या जखमांच्या ठिकाणी पुन्हा वेदना होतात.