मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप आपल्याला पाह्यला मिळत आहे. अशातच अजित पवार गटातील नेत्यांवर आणि अजित पवारांवरही रोहित पवार टीका करताना दिसत आहे.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना अजित पवार यांनी रोहित पवारांना झिडकारलं. म्हणाले रोहित एवढा मोठा नाही, मी त्याच्या प्रश्नावर उत्तर द्याव, माझे आमदार आणि प्रवक्ते उत्तर देतील, असे अजित पवार यांनी म्हणाले होते.
त्यानंतर, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन रोहित पवारांन पुन्हा एकदा डिवचलं आहे. तसेच, रोहित पवार हेच भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक होते, पण आता पुरोगामी असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत, असं मिटकरी म्हणाले. बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला गगनाला गवसणी घालण्याचे डोहाळे लागलेले दिसतात.
या अध्यक्षांनी भाजपसोबत जाण्यासाठी पवार साहेबांना अनेक वेळा गळ घातली. आता, स्वतःला पुरोगामी सिद्ध करायला वाटेल ते करायला तयार आहेत. शिर्डीच्या अधिवेशनात बोलू न दिल्याने अध्यक्ष फारच चिडलेत. असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. त्यानंतर रोहित पवार यांनी आठ दिवसापूर्वी दिल्लीला कोण गेलं होतं, हे तपासा असा प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला होतं. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, कोण कधी आणि कुठे गेला होता याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत. त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. जर काही केलेलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. असं अजित पवार म्हणाले होते.
बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला गगनाला गवसणी घालण्याचे डोहाळे लागलेले दिसतात.या अध्यक्षांनी भाजपसोबत जाण्यासाठी पवार साहेबांना अनेक वेळा गळ घातली. आता स्वतःला पुरोगामी सिद्ध करायला वाटेल ते करायला तयार आहेत. शिर्डीच्या अधिवेशनात बोलु न दिल्याने अध्यक्ष फारच चिडलेत.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 6, 2024