हडपसर: विधीसंघर्षीत बालकांना गंभीर गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी हडपसर पोलिसांकडून एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बाल गुन्हेगारांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग वाढत असल्यामुळे व बाल गुन्हेगारांकडुन वांरवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आल्याने बाल गुन्हेगारांचा त्यांच्या पालकांसह मेळावा शनिवारी हडपसर पोलीस स्टेशन येथील चैतन्य सभागृह याठिकाणी पार पडला. या मेळाव्यास ७० ते ८० विधीसंघर्षात बालक व त्यांचे पालक उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनचे सदस्यांनी व पोलीस अधिकारी यांनी उपस्थित बालक व त्यांच्या पालकांना कायदेविषयक माहीती देऊन शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. तसेच पालकांनी बालकांविषयी आपली जबाबदारी ओळखुन त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्याच्या सुचना दिल्या. सध्या सोशल मिडीयाचा गैरवापर व त्याच्या माध्यमातून वाढत्या बालगुन्हेगारी बाबत माहीती दिली. अंमली पदार्थाचे सेवन व त्यातून वाढणारी व्यसनाधिनता, पर्यायाने वाढणारी गुन्हेगारी, पौष्टीक आहार कसा असला पाहीजे, व्यायामाचे महत्व, वाहतुकीचे नियम, गुड टच व बँड टच याबाबत योग्य मागदर्शन केले. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्यांना मागदर्शन करण्यात आले. मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन ११२, बालक हेल्पलाईन १०९८ व १०९१ यावर संपर्क साधुन मदतीसाठी आवाहन करण्यात आले.
होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशन (एनजीओ) संस्थेचे वसीम शेख, विशाल वाघमारे, शैलश पाटोळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, सपोनि सारीका जगताप, मपोउपनिरी सुवर्णा गोसावी व सपोफी दिनेश शिंदे व दामीनी पथक, मपोअंमलदार वैशली उदमले या सर्वांनी विधीसंघर्षीत बालक व पालक यांना योग्य ते मागदर्शन करुन समुपदेशन केले.