Health News: पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यासाठी अनेक प्रयत्नही केले जातात. पण असे काही आजार आहेत ते काही केल्या आपली पाठ सोडत नाही. मात्र, वेळीच जर उपचार केले त्यापासून नक्कीच आराम मिळू शकतो. त्यापैकीच एक म्हणजे रक्तदाब. रक्तदाब ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाब होण्याची तशी काही विशेष कारणे नसतात. 85 ते 90 टक्के लोकांमध्ये रक्तदाब होण्याची काहीही कारणं नसतात; पण आजच्या धावपळीच्या युगात मुख्य कारण आहे तणाव. बदलती जीवनशैली, अतिशय तेलकट व तुपट खाणे, कॉफी, फास्टफूडच्या अतिसेवनाने, धूम्रपान, दारू सेवनाने उच्च रक्तदाब वाढतो. मूत्रपिंड, थायरॉइड, रक्तवाहिन्यांतील दोष वगैरे आढळलेल्या आजारांवर इलाज केल्यास या प्रकारचा रक्तदाब पूर्णत: बरा होतो.
सर्वसाधारण वैद्यकीय तपासणीच्या वेळेसच रक्तदाब वाढल्याचे आढळते. पण 75 ते 80 टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबांची लक्षणे आढळून येतात; पण आपल्या शरीरातील अवयवावर याचे दुष्परिणाम होतात. म्हणून याला सायलेंट किलर असे म्हटले जाते. आजार जास्त वाढल्यावर याची लक्षणे दिसून येतात. मुख्यत: ही लक्षणे उच्च रक्तदाबामुळे संवेदनशील अवयवावर होतात.
थोड्या श्रमाने थकवा लागणे व दम लागणे, डोकेदुखी, नाकातून रक्तस्राव, अनिद्रा, चिडचिडेपणा, समरणशक्ती कमी होणे, बेचैनी, घबराट, अतिघाम येणे, हृदयात धडधड वाढणे, छातीत दुखणे, डोळ्यासमोर अंधारी येणे आदी लक्षणे जाणवतात. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास जरी जाणवत असला तरी घाबरून जाऊ नये. पण वेळेत उपचार घ्यावेत. रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचारही सुरु करावेत.