पुणे : पोलिस म्हटलं की आपल्याला लगेच आपलं संरक्षण करणारी खाकी वर्दीतील व्यक्ती नजरेसमोर येते. याच पोलिसांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम केले जाते. महाराष्ट्र पोलिस देशातील सर्वांत मोठ्या पोलीस दलांपैकी एक अशी संस्था आहे. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वांत मोठे राज्य असून, महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे.
महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून, त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीस दले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 1,80,000 आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून, महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे.
पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून, राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते. या पोलिस खात्याचा कारभार अर्थात गृहखात्यामार्फत केला जातो. राज्याचे गृहमंत्री हे त्या खात्याचे प्रमुख असतात. त्यांच्याच हातात गृह अर्थात पोलिस खात्याचा कार्यभार असतो. त्यांच्या सहीनुसार, अति वरिष्ठ, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच बढत्यांना मान्यता दिली जाते.
राज्यात किती आहेत पोलिस आयुक्तालय?
महाराष्ट्र राज्यात सध्या 12 पोलिस आयुक्तालय आहेत. त्यात बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड, मीरा-भाईंदर अशी आयुक्तालय कार्यरत आहेत.
महाराष्ट्र पोलिसांच्या संबंधित शाखा कोणत्या?
महाराष्ट्र पोलिसांच्या संबंधित अनेक शाखा आहेत. त्यात गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, क्राईम सरविल्ययंस इंटेलिजन्स कौन्सिल, महाराष्ट्र महामार्ग पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण आणि खास पथके, नागरी हक्क संरक्षण विभाग, मोटार परिवहन विभाग, पोलीस बिनतारी संदेश विभाग, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग
महाराष्ट्र पोलीस दलातील इतर विभाग कोणते?
महाराष्ट्र पोलीस दलाचे काही इतर महत्वाचे विभाग देखील आहेत. त्यांचे कार्यही वेगवेगळे आहे. वर्गवारीनुसार त्यांच्याकडून कामकाज पाहिले जाते. त्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) तसेच फोर्स वनची स्थापना एसपीजी, एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे.