दिनेश सोनवणे
दौंड : कुरकुंभ (ता दौंड) येथील प्रसिद्ध फिरंगाई देवीच्या मंदिरात आज घटस्थापनेपासून नवरात्रात उत्सवाला सुरुवात झाली आहे.
कुरकुंभ (ता दौंड) येथील प्रसिद्ध फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी भाविक जिल्ह्यातील विविध भागातून येत असतात. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी सुसज्ज अशी दर्शनबारी, सीसीटीव्ही कॅमेरे, पाणी व्यवस्थापन, आदी करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात आकर्षण अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे.
नवरात्र महोत्सवाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
१) सोमवारी (ता.२६) अभिषेक महापूजा, घटस्थापना सप्तीशती पाठ आरती, दोन वेळ पालखी (छबिना) चौघडा वादन,
२) मंगळवारी (ता.२७) ते ३ ऑक्टोबर पर्यंत अभिषेक, महापूजा,सप्तीशती पाठ आरती, दोन वेळ पालखी (छबिना) चौघडा वादन नियमितपणे,
३) मंगळवारी (ता.४ ऑक्टोबर) अभिषेक महापूजा, होमहवन, बलिदान, पूर्णाहुती नवरात्र (नवरात्र उठविणे)
४) बुधवारी (ता.५) रोजी पालखी (छबिना) मिरवणूक सीमोल्लंघन (विजया दशमी दसरा) , कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने अभिषेक महापूजा, आरती, दोन वेळ पालखी (छबिना) चौघडा वादन.
दरम्यान, फिरंगाई देवीच्या मंदिर प्रशासनाने वरील विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, भाविकांनी मंदिरात गोंधळ न करता देवीचे दर्शन शांततेत घ्यावे. असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.