पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात आगीची भीषण घटना घडली आहे. विमाननगरमधील सिंबोयसेस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
रोहन मिथिला इमारतीलगत घटनास्थळी 100 गॅस सिलेंडर होते. त्यापैकी एकापाठोपाठ 10 सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, जीवित किंवा जखणींबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ज्या ठिकाणी स्फोट झाला ते पत्र्याचा शेड होते. या शेडमध्ये 100 सिलेंडर होते. त्यापैकी 10 सिलेंडरचा दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी स्फोट झाला. पत्र्याचे शेड आणि गॅस सिलेंडर अनाधिकृत असल्याचा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अद्याप कोणीही जखमी झालेल्याची माहिती नाही. शिवाय, कोणतीही जीवितहानी नाही. युद्ध पातळीवर अग्निशनम दलाचे जवान कार्य करत आहेत. सिलेंडरचा स्फोट कसा झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.