पुणे : खडकवासला धरणाशेजारी असलेल्या डीआयएटी जवळ पाण्यात तरंगताना एका अनोळखी ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर ठिकाणी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून हवेली पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २४) सकाळी खडकवासला धरणाशेजारी असलेल्या डीआयएटी जवळ असलेल्या पाण्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आल्यची माहिती एका मच्छिमाराने हवेली पोलीस ठाण्यात दिली. मिळालेल्या महितीच्या आधारे खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहतूक नियमनासाठी तैनात असलेल्या हवालदार विलास बांबळे यांना कळविण्यात आली.
दरम्यान, हवालदार विलास बांबळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन काही स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृत महिलेचे वय अंदाचे साठ वर्षांपेक्षा जास्त असून तपकिरी रंगाची नऊवारी साडी, लाल रंगाचे स्वेटर घातलेले आहे. याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा संबंधित वर्णणाची महिला बेपत्ता असल्यास हवेली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.