जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये गुरुवारी (21 डिसेंबर) दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला. लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे बुधवारी (20 डिसेंबर) रात्री पूंछमधील सुरनकोट भागात असलेल्या डेरा की गली (DKG) मध्ये संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.
Terrorists fire at Army vehicle carrying jawans in Jammu and Kashmir’s Poonch district: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2023