लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १७ वा वर्धापनदिन व संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांचा ७३ वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रविणशेठ भिलारे, महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या महिला सहप्रमुख आश्विनी आठवले, उद्योजक मयूर व्होरा, बिलीमोरिया हायस्कूलचे अद्यक्ष अरुणभाई गोराडिया, कार्यकारी संचालिका आदिती गोराडिया, गुरेघरचे सरपंच रमेश चोरमले, लेखक जगन्नाथ शिंदे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, किरण जानकर, माजी नगरसेविका रेखा जानकर, माजी नगरसेवक संजय घोडके, जावली बँकेचे संचालक अजित कळंबे, बाजार समितीचे संचालक गुलाब गोळे, उद्योजक उल्हास कासुर्डे, प्रकाश गोळे, प्रशांत कासुर्डे, रोहित ढेबे, अपाध्यक्ष रमेश खरात, संचालक तानाजी भिलारे,अंजना चौरसिया, प्रतिभा कासुर्डे, विजय कासुर्डे, दिलिप टेके, सुर्यकांत गोळे, अविनाश माने, विजय कांबळे, सचिन वाडकर व्यवस्थापक विक्रम पोरे, कर्मचारी फिरदौस शेख, कल्याणी कांबळे, विजय कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बिलिमोरीया हायस्कूलच्या कार्यकारी संचालिका आदिती गोराडिया, बिलिमोरीया स्कूलची धनुर्विद्या खेळाडू श्रुती तेजपाल जैन, महात्मा फुले विद्यालय व जे. पी. महेता ज्यू कॉलेजचा तलवारपटू पियुश विनोद लकेरी, दांडेघरची डॉ. वृषाली राजेंद्र कळंबे, शिष्यवृत्तीत राज्यात चौथी आलेली रांजणी शाळेची विद्यार्थिनी संस्कृती सचिन अभंग आणि पांचगणी क्रेडिट सोसायटीचे संचालक दिलीप बावळेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना राजेंद्रशेठ राजपुरे म्हणाले की, स्पर्धेच्या जगात पतसंस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सहकारातील या गतिमान स्पर्धेतही पांचगणीतील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शकपणे सभासदांचे हित जपले आहे. यापुढेही संस्थेने सर्वसामान्य सभासदांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करावा.
या वेळी उपस्थितांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांचे अभिष्टचिंतन करून संस्थेच्या वाढीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या महिला सहप्रमुख आश्विनी आठवले यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रमोद पवार यांनी मानले.