Gadchiroli News : गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी रस्त्याच बांधकाम सुरू असताना ट्रॅक्टर आणि जेसीबी जाळल्याची घटना घडली आहे. भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम हिदूर गावात ही घटना घडली. त्यामुळे कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. काल मंगळवारी 19 डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहने पेटवली. त्याशिवाय 22 डिसेंबर रोजी बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमधील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
भामरागडपासून दहा किलोमीटरवर रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री नक्षल्यांनी बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. यात एक जेसीबी, टँकर जळून खाक झाली आहेत. त्यामुळे कंत्राटदराचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याच्या कामाला नक्षल्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. हा भाग नक्षलप्रभावित व संवेदनशील असल्याने येथे कायम नक्षल्यांचे कटकारस्थान सुरू असते. अशीच एक कारवाई 19 डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी केली.
हा भाग छत्तीसगड सीमेलगत असल्याने या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर नागरिकांचे अवागमन या मार्गाने वाढेल असते. तसेच अनेक गोपनिय हालचालींवर बंधन आली असती. या भीतीमुळे हे विकासकाम नक्षल्यांना नको होते. यामुळे नक्षल्यांनी वाहने जाळून या विकासकामाल विरोध दर्शविला आहे.