पुणे : धनकवडी परिसरातील अहिल्यादेवी चौकात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतपर लावण्यात आलेल्या कमानीवर कुणीतरी गुरुवारी (ता. २२) काळे फासल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बारामती मतदासंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी व भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भाजपाने जबाबदारी दिली आहे.
सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथील शिवछत्रपती सभागृहात खडकवासला मतदार संघाच्या वतीने आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त गुरुवारी स्वागतपर कमान लावण्यात आली होती.
या प्लेक्स कमानीवर काही समाजकंटकांनी रात्रीतून काळे फासले. तसेच या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नाहीं, अथवा फिर्याद नोंदवण्यात आली नाही.