मुंबई: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जालना सहकारी साखर कारखाना मनी लॉड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टानं अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापाडिया यांना 12 जानेवारी 2024 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
जालना साखर कारखान्याची निर्मिती ही 1984 साली झाली होती. तत्कालीन राज्य सरकारने या साखर कारखान्यासाठी तब्बल 100 एकर जमीन विनामूल्य दिली होती. 9 हजाराच्या आसपास भागधारक शेतकरी असलेला हा कारखाना सध्या तोट्यात आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेलं कर्जही थकीत झाले आहे.
दरम्यान, थकीत कर्ज चुकवण्यासाठी अर्जुन खोतकरांनी पुन्हा कर्ज घेतलं, पण घेतलेलं तेही कर्जही थकीत झालं. अनेक अनावश्यक अर्थिक व्यवहार करून अर्जुन खोतकरांनी मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं कोर्टानं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे खोतकरांना हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.